लडाख विषयी थोडक्यात माहिती - Information about Ladakh in Marathi
उत्तरेतील काराकोरम पर्वत आणि दक्षिण हिमालय पर्वताच्या दरम्यान
लडाखच्या उत्तरेस चीन तर, पूर्वेस तिबेटच्या सीमा आहेत.
समुद्र सपाटीपासून लडाख ९ हजार ८४२ फूट उंचीवर आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमारेषा व युद्ध रणनीतीच्या अनुषंगाने हा प्रदेश भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे.
लडाख येथे सापडलेल्या अनेक शिलालेखांवरून हा प्रदेश नव-पाषाणकाळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते.
लडाखची राजधानी : लेह
लडाख या प्रदेशात लेह आणि करगिल हे महत्त्वाचे जिल्हे आहेत.
२०११ च्या जनगणनेनुसार लडाखची एकूणलोकसंख्या २ लाख ७४ हजार २८९ आहे.
कारगिल जिल्ह्याची लोकसंख्या १ लाख ४० हजार ८०२ आहे. यात सर्वाधिक ७६.८७ टक्के मुस्लीम धर्मीय (शिया समूदायाचीसंख्या अधिक) आहेत.
लेह जिल्ह्याची लोकसंख्या १ लाख ३३ हजार ४८७ आहे. यात ६६.४० टक्के बौद्ध धर्मीय आहेत.
सिंधू नदी लडाखची जीवनवाहिनी आहे. सिंधू नदीला हिंदू धर्मात पूजनीय नदी मानले जाते, जी केवळ लडाखमधून वाहते.
सिंधू नदीच्या काठी वसलेली ऐतिहासिक स्थळे लेह, शे, बासगो, तिंगमोसगंग
१९४७ साली भारत-पाक युद्धानंतर सिंधू नदीचा हा एकमेव हिस्सा लडाखमधून प्रवाहित आहे.
१९७९ साली लडाख प्रदेशात कारगिल आणि लेह या दोन जिल्ह्यांची निर्मीती केली गेली.
मध्य आशियासोबत व्यापारी दळणवळण करण्याचे महत्त्वाचे ठिकाण म्हणून लडाखचे अस्तित्व होते. 'सिल्क रूट'ची एक शाखा लडाख प्रदेशातून जात होती.
दुस-या प्रदेशातून येणारे व्यापारी येथे शेकडो ऊंट, घोडे, खेचर, रेशीम आणि गालीचे विक्रीसाठी आणत असत. तर, हिंदूस्थानातून रंग, मसाले आदींची विक्री केली जात असे.
=============================================================
युट्यूब चॅनेल:- स्पर्धांकुर [Spardhankur]
टेलिग्राम चॅनेल:- MPSC संपूर्ण तयारी
फेसबुक पेज:- स्पर्धा परीक्षा माहिती मंच
टेलिग्राम ग्रुप:- स्पर्धांकुर MPSC
जॉब अलर्ट वेबसाइट :- My Desi Job
=======================================================
Post a Comment