सुस्वागतम !!! MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.

Apr 21, 2019

पिनाकी चंद्र घोष: भारताचे प्रथम लोकपाल

pinaki ghosh

१) सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. पिनाकी चंद्र घोष यांची भारताचे प्रथम लोकपाल म्हणून निवड करण्यात आली आहे.
२) औपचारिकता पूर्ण करून राष्ट्रपती राम नाथ कोविंद न्या. घोष यांची अधिकृत नेमणूक करतील.
३) न्या. घोष यांच्या नेमणुकीने लोकपाल कायदा संमत झाल्यानंतर पाच वर्षांनी भारताला पहिला लोकपाल मिळाला आहे.
४)न्या. घोष 66 वर्षांचे असल्याने वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजे सुमारे चार वर्षे ते लोकपाल संस्थेचे अध्यक्ष राहतील.
५)त्यांना पगार व दर्जा सरन्यायाधीशासमान असेल.
६)न्या. घोष सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आहेत.
७)सर्वोच्च न्यायालयातून सन 2017 मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांची आयोगात नेमणूक झाली होती.

लोकपाल म्हणजे काय?

Apr 17, 2019

युरो चलनाला २० वर्षे पुर्ण (चालू घडामोडी)

euro


 ‘युरो’ या चलनाला यावर्षी 20 वर्षे पूर्ण झाली. ‘युरो’ हे युरोपीय संघाच्या (EU) युरोक्षेत्रामधील देशांचे अधिकृत चलन आहे.

⏩युरोचा इतिहास

7 फेब्रुवारी 1992 रोजी नेदरलँड्सच्या मास्ट्रिच शहरात झालेल्या करारामध्ये युरोपीय संघासाठी समान चलन वापरण्याचा निर्णय घेतला गेला. 16 डिसेंबर 1995 रोजी माद्रिद येथे ह्या चलनाचे नाव ‘युरो’ असे ठेवले गेले.

प्रत्येक वापरकर्त्या देशाच्या चलनाबरोबर युरोचा विनिमय दर दिनांक 31 डिसेंबर 1998 रोजी ठरवला गेला. आणि दिनांक 1 जानेवारी 1999 रोजी ‘युरो’ चलन अस्तित्वात आले, परंतु त्यावेळी त्याचा वापर केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचाच होता. दिनांक 1 जानेवारी 2002 रोजी युरोच्या नोटा व नाणी अधिकृतपणे वापरात आणली गेली.

Mar 25, 2019

गोव्याचे नवीन मुख्यमंत्री 'प्रमोद सावंत' तसेच मुख्यमंत्री पदाबद्दल थोडक्यात माहिती.मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

प्रमोद सावंत यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ.

प्रमोद सावंत यांच्याविषयी थोडक्यात :-

✏️जन्म : जन्म २४ एप्रिल १९७३ ( केशवानंद भारती खटला)
✏️ मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती आहेत.
✏️गोव्यातील सांखळी मतदार संघातून दोनदा निवडून आलेले आहेत.
✏️यापूर्वी कोणतेही मंत्रिपद भूषविलेले नाही.
✏️आयुर्वेदिक डॉक्टर.

मुख्यमंत्री पदासाठी काही घटनात्मक तरतुदींची उजळणी:-

Dec 1, 2017

परीक्षेत विचारलेले इंग्रजी समानार्थी शब्दZP, STI, PSI, तलाठी, जिल्हा निवड समिती ई. परीक्षेत विचारण्यात आलेले इंग्रजी समानार्थी शब्द एकण्याकरिता खालील व्हिडियो पहा, धन्यवाद!

व्हिडियो:-


Nov 6, 2017

चालू घडामोडी 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर


1.भारतीय महिला आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत
2.लुईस हेमिल्टनला फोर्मुला वनचे जगजेत्तेपद
3.उद्योगस्नेही देश्यांच्या यादीत भारत 100 वा
4.तमिळ लेखक मेलनमाई पोन्नुसामी यांचे निधन
5.राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत हिना सिंधूला सुवर्ण

Nov 4, 2017

इंग्रजी शब्दांचे उगमस्थान- Origin of English WordsLatin आणि French भाषेतून इंग्रजीत शब्द कसे आले आणि त्यांना लक्ष्यात ठेवण्याची अत्यंत सोपी पद्धत जाऊन घेण्यासाठी वरील व्हिडियो नक्की पहा.