शाहु महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती | Shahu Maharaj Information in Marathi | MPSC Study


Shahu Maharaj

History is a very important subject in Competitive Exams. MPSC Rajyaseva, STI, PSI, ASO, Police Bharti, Zilla Parishad etc exams have various numbers of question ask on History. MPSC Alert trying to cover Various topics on this Subject. Here we are going to post about great personality i.e Shahu Maharaj information in Marathi.

राजर्षी शाहु महाराज (1874-1922)

राजर्षी शाहु महाराज यांचा जन्म 26 जुन 1874 रोजी कोल्हापुर जिल्हयातील कागल या गावी घाटगे घराण्यात कागल येथीललक्ष्मी विलास पॅलेसमध्ये झाला. शाहु महाराज यांचे मुळ नाव यशवंत (यशवंत जससिंगराव घाटगे) होते. शाहू महाराज यांच्या वडीलांचे नाव जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब होते. तर त्यांच्या आईचे नावराधाबाईअसे होते. शाहु महाराज हे ०३ वर्षांचे असताना त्यांच्या जन्मदात्या आईचा मृत्यु झाला.

26 जुन हा शाहु माराजांचा जन्म दिवस महाराष्ट्र शासनाने 2006 पासुन सामाजिक न्याय दिन म्हणुन साजरा करण्याचे घोषीत केले आहे.                                                                     

17 मार्च 1884 रोजी कोल्हापुर संस्थानच्या तत्कालीन महाराणी आनंदीबाई साहेब यांनी शाहु महाराज यांना दत्तक घेतले. त्यावेळी ब्रिटीश सरकार तर्फे मुंबईचा गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन कर्नल एच. .रिव्हज यांनी शाहु महाराजांच्या दत्तक विधानास मान्यता दिली. शाहु महारांचे सुरवातीचे शिक्षक म्हणुन श्री कृष्णाजी भिकाजी गोखले हरिपंत गोखले यांना नेमले होते. 20 मार्च 1886 रोजी शाहु महाराज यांचे वडील जयसिंगरा व यांचा मृत्यु झाला.

शाहु महाराज यांचे शिक्षण :

Shahu Maharaj in Marathi

1885 ते 1889 या काळात शाहुमहारांजी राजपुत्रांच्याराजकोटमहाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यांना या महाविद्यालयाचे प्रिन्सीपॉल मॅकनॉटन यांनी विशेष मार्गदर्शक केले. याच काळामध्ये दत्ताजी शिंदे पांडुरंग भोसले यांच्या कडुन मल्लविद्येचे शिक्षण शाहु महाराजांनी घेतले. 8 मे 1888 रोजीकोल्हापूर ते मिरजया रेल्वे मार्गाची पायाभरणी ही शाहु महाराजांच्या हस्ते करण्यात आली. 1890 ते 1884 या काळात शाहु महाराजांनीधारवाडयेथीलएस.एम.फ्रेजरयांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले. इंग्रजी भाषा, जगाचा इतिहास राज्य कारभाराचे धडे शाहु महाराजांना एस.एम.फ्रेजर यांनी दिले. 1 एप्रील 1891 रोजी बडोदा येथील गुणाजी खानविलकर यांची कन्यालक्ष्मीबाईयांच्याशी शाहु महारांजाचा विवाह झाला. शाहु महाराजांना राधाबाई आऊबाई अशा दोन मुली तर राजाराम शिवाजी अशी दोन मुले अशी एकुण 4 आपत्ये होती. यातील राजकुमार शिवाजी यांचा १९२० साली रानडुकराच्या शिकारीच्या वेळी घोड्याहुन पडुन मृत्यु झाला होता. 1893 मध्ये कोल्हापुर संस्थानने स्वत:चे कायदे पुस्तक तयार केले.

2 एप्रील 1894 रोजी शाहु महाराजांचा “राज्याभिषेकहोवुन वयाच्या 20 वर्षी कोल्हापूर संस्थानाची सुत्रे शाहु महाराजांनी स्विकारली शाहु महाराजांच्या राजकीय कार्यकाळास सुरूवात झाली शाहु महाराजांच्या साहेळ्या दाम्यान ब्रिटीश सरकार तफ्रे मुंबईचा गव्हर्नर लॉडै हॅरिसन हा उपस्थि होता. 1895 मध्ये शाहु महाराजांनी कोल्हापून येथेशाहुपूरीही गुहााची बाजारपेठ सुरू केली. 1896 साली सर्व जाती जमातींच्या विद्यार्थांसाठी शाहु महाराजांनीराजारामहे वस्तीगृह सुरू केले याच सालापासुन शाहु महाराजांच्या वस्तीगृह निर्मीतीच्या कार्याला सुरूवात झाली. 1897 साली महारोग्यांसाठीव्हिक्टोरीया लेप्रसीया हॉस्पीटलची स्थापना शाहु महाराजांनी केली. नोव्हेंबर 1899 मध्ये शाहु महाराजांच्या जिवनास कलाटणी देणारेवेदोक्त प्रकरणघडले. शाहु महाराज पंचगंगा नदी काठी स्थानासाठी गेले असमान त्यांचे पुरोहीत नारायण भटजी हे वेदोक्‍त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे महाराजांचे सहकारी राजाराम शास्त्री भागवत यांनी माहराजांना लक्षात आणुन दिले. या बाबत महाराजांनी विचारणा केली असता महाराज हे क्षेत्रीय नसल्यामुळे त्यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार नसल्याचे सांगतीले. येतुन खऱ्या अर्थाने ब्राम्हणेत्तर संघर्ष चळवळीस सुरूवात झाली. 1901 मध्ये शाहु महाराजंनी आप्पासाहेब राजोपाध्याय यांचे वतने जप्त केली. नारायण भट्ठ सेवकरी यांच्या कडुन वेदोक्त पध्दतीने श्रवणी केली.

वेदोक्त प्रकरणामध्ये लोकमान्य टिळक शृंगरीचे जगद्तगुरू शंकराचार्य यांनी ब्राम्हणांची बाजु घेतली शाहु महाराजांवर टिका केली. 16 एप्रील 1902 रोजी वेदोक्त प्रकरणासंदर्भात ब्रिटीश शासनाने नेमलेल्या वेदोक्त समितीने शाहु महाराजांच्या बाजुने निकाल देवुन शाहुंना वेदोक्त मंत्राचा अधिकार असल्याचा निकाल दिला. राजर्षी शाहु महाराज हेडेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष होते. वेदोक्त प्रकरणानंतर शाहु महाराजांनी या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

सामाजिक कार्य :

Shahu maharaj kary

1901
मध्ये शाहु महाराजांनी कोल्हापुर संस्थानामध्येगोहत्या प्रतीबंधक कायदालागु केला. 1901 साली शाहु महाराजांनीव्हिक्टोरीया मराठा बोर्डींगची स्थापना केली. परंतु या बोर्डींगमध्ये फक्त ब्राम्हण मुलेच राहु लागल्याने शाहुंनी निरनिराळ्या जांतीच्या लोकांसाठी वस्तीगृहे सुरु केली. 18 एप्रील 1901 रोजी जैन, लिंगायत मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रय वस्तीगृह शाहु महाराजांनी स्थापन केली. 1 जुन 1902 रोजी शाहु महाराज हे इंग्लंडच्या 7 व्या एडवर्ड च्या राज्यरोहन संमारंभासाठी इंग्लंडला गेले होते. या कार्यक्रमाचे वेळी केंब्रीज विद्ययापीठाने शाहु महाराजांना LLD ही पदवी बहाल केली. 26 जुलै 1902 रोजी शाहु महाराजांनी कोल्हापुर संस्थानातील मागासवर्गीय लोकांसाठी ५० टक्के जागा राखीव आरक्षीत ठेवल्या. आरक्षण बाबतचा हा जाहीरनामाकरवीर गॅजेटमधुन प्रकाशित करण्यात आला होता.

1902 साली शाहु महाराजांनीपाटबंधारे धोरणघोषीत केले. 1905 साली शाहु महाराजांनी राजोपाध्याय यांची इनामे जप्त केली छात्र जगद्तुरूचे नवे पीठ निर्माण करुन मराठा जातीच्यासदाशिव बेनाडीकरयांची पीठाचे प्रमुख म्हणुन नेमणुक करण्यात आली. तसेच संस्थान मध्ये निरनिराळ्या जातींचे पुरोहीत निर्माण करण्याकरीतापुरोहीत शाळानिर्माण केल्या. 1906 मध्ये शाहु महाराजांनीछत्रपती शाहु स्पिनींग जिनींग मिलस्थापन केली. (2003 मध्ये महाराष्ट्र शासनाने ही मिल बंद केली आहे.) 1906 साली शाहु महाराजांनी कोल्हापुर संस्थानातरात्रशाळासुरु केल्या. तर 1907 साली शाहु महाराजांनी मुलींसाठी रात्रशाळासुरू केल्या. 1907 साली कोल्हापुरच्या पश्चिमेस 55 केमी अंतरावर दाजीपुर पवळ भोगावती नदीवर धरण बांधुन त्याच्या जलाशयासमहाराणी लक्ष्मीबाईहे नाव देण्यात आले. या धरणाचे काम सबनीस या इंजिनीअर कडुन करुन घेण्यात आले. याच धरणाशेजारी शाहु महाराजांच्रूा मुलीच्या नावावरराधानगरीहे गाव वसविण्यात आले. 1908 साली शाहु महाराजांनी अस्पृश्यांसाठीमिस क्लार्कहे वस्तीगृह स्थापन केले. 20 मे 1911 रोजी शाहु महाराजांनी संस्थानामार्फत जाहीरनामा प्रसिद्ध करुन संस्थानातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 15 टक्के शिष्यवृत्तीची घोषणा केली. 1911 साली शाहु महाराजांनी शिंपी समाजाच्या मुलांसाठीनामदेव वस्तीगृहसुरू केले.

राजर्षी शाहु महाराज विषयी महत्वाचे :

shau maharaj mpsc

            .     11 जानेवारी 1911 रोजी शाहु महाराजांनी कोल्हापुर येथेसत्यशोधक समाजया संस्थेच्या शाखेची स्थापना केली
त्यांचे अनुयायी भास्करराव जाधव यांची अध्यक्ष म्हणुन नेमणुक केली. भासकर जाधव यांचे पुस्तकघरचा पुरोहीतहे आहे.

·         1911 च्या हुकूमनाम्यानुसार अस्पृश्यांना मोफत शिक्षण देण्यास सुरूवात केली.

·         1912 साली शाहु महाराजांनी काल्हापूर संस्थानमध्येसहकारी कायदापारीत केला.

·         1912 -13 साली शाहु महाराजांनी संस्थान मधील शेतकऱ्यांना शेती विषयक शिक्षण देण्याकरीताकिंग एडवर्ड इन्स्टिट्युटया संस्थेची स्थापना केली.

·         1913 मध्ये कोल्हापूर संस्थानमध्ये सत्यशोधक समाजाच्या शाळा सुरु करुन त्याच्या प्रमुखपदी विठ्ठलराव ढोणे यांची नेमणुक शाहु महाराजांनी केली.

·         1917 साली विधवा पुर्नविवाहास मान्यता देणारा कायदा शाहु महाराजांनी पारीत केला.

·         25 जुलै 1917 रोजी प्राथमिक शाळेमध्ये फी माफीची घोषणा शाहु महाराजांनी केली.

·         21 नोव्हेंबर 1917रोजी प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत केले. यासंबधाने पहीलीशाळाचिपरीपेटायेथे शाहु महाराजांनी सुरू केली.

·         (1893 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले संस्थानिकसयाजीराव गायकवाड)

·         1917 साली जातवार प्रतीनिधीत्वासाठी शाहु महाराजांनी भारत मंत्री लार्ड माँन्टेग्यु यांची भेट घेतली.

·         महत्वाचे : शाहु महाराजांनी १९१९ च्या माँटेग्यु-चेम्सफर्ड या कायद्याचे स्वागत केले होते.

·         4 मार्च 1918 रोजी करवीर तालुक्यातील चिखली या गावी सक्तीचे मोफत शिक्षण देणारी शाळा शाहु महाराजांनी सुरु केली.

·         1918 साली शाहु महाराजांनी महार वतने, बलुतेदारी वेठबिगारी प्रथा बंद केली. तसेच आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा केला.

·         1918 मध्ये शाहु महाराजांनी कोल्हापूर संस्थान मध्येतलाठी शाळासुरू केल्या.

·         1918 साली शाहु महाराजांनी कोल्हापुरमध्येआर्य समाजया संस्थेच्या शाखेची स्थापना करून राजाराम महाविद्यालय हे आर्य समाजाकडे हस्तांतरीत केले.

·         1919 साली शाहु महाराजांनी स्त्रीयांना क्रुरपणे वागणुक देण्याच्या प्रथेवर प्रतीबंधक कायदा मंजुर केला.

·         1920 मध्ये शाहु महाराजांनी संस्थानामध्येघटस्फोटाचा कायदासंमत केला.

·         1920 मध्ये शाहु महाराजांनी कोल्हापूर येथेलक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कुलची स्थापना केली.

·         1920 मध्ये शाहु महाराजांनी गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणुन कोल्हापूर येथेप्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसची स्थापना केली.

·         शाहु महाराजांनी महार पैलवानांना जाट पैलवान चांभारांना सादार भंग्यांना पंडीत अशा पदव्या दिल्या होत्या. शाहु महाराजांनी काल्हापूर नगर पालिकेच्या चेरमनपदीदत्तोबा पवारयास अस्पृयाची नेमणुक केली होती.

·         6 मे 1922 रोजी वयाच्या 48 व्या वर्षी मुंबई येथील खेतवाडी मधीलपन्हाळा लॉजया बंगल्यावर शाहु महाराजांचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यु झाला.

·         शाहू महाराजांच्या स्मरणार्थ कोल्हापूर येथील रेल्वे स्थानकासछत्रपती शाहु टर्मिनसहे नाव देण्यात आहे.

शाहु महाराज यांनी भूषविलेली कार्ये :

shahu maharh history

छत्रपती
शाहु महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज महाराणी ताराबाई यांना आपले दैवत मानत. डॉ. आंबेडकर यांच्यामुकनायक आगरकर यांच्यासुधारकया वृतपत्रांना शाहु महाराजांनी आर्थीक सहकार्य केले होते. शाहू महाराजांनी पं.. मोहन मालविय यांच्या विनंतीवरुनबनारस हिंदु विश्व विद्यालयासआर्थिक सहकार्य केले. थिऑसॉफिकल सोसायटीया धार्मीक संघटनेचा शाहु महाराजांवर विशेष प्रभाव होतो. शाहु महाराजांनी गंगाधार कांबळे या अस्पृश्य समाजाच्या व्यक्तीस चहाचे हॉटेल टाकुन दिले त्या हॉटेललासत्यशोधक हॉटेलअसे नाव दिले. ब्रिटीशांच्या विरोधात शिवाजी क्लब ही क्रांतीकारी संघटना काल्हापूर येथे स्थापन करण्यातआली होती. शाहु महाराज हे दरवर्षी संस्थानाचे कपडे खरेदी करत असत.  

शाहु महाराजांनी कोल्हापूर संस्थानमध्ये तांत्रीक शिक्षणाकरीता जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्युट या संस्थेची स्थापना केली. शाहु महाराजांनी मुलांमध्ये लष्करी जीवनाची आवड निर्माण्‍ व्हावी म्हणुन कोल्हापूर येथेइन्फंट्री स्कुलची स्थापना केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्लंड मधील शिक्षण घेण्याकरिता शाहु महाराजांनी शिष्यवृती देवुन आर्थिक सहाय्य केले होते. (महत्वाचे :- डॉ आंबेडकर यांना अमेरीकेतील कोलंबिया येथील शिक्षण करीता सयाजीराव गायकवाड यांनी आर्थिक मदत केली होती)

शाहु महाराजानी भुषविलेली अध्यक्षपदे :

shahu maharaj info mpsc

            ·
         10 नोव्हेंबर 1918 रोजी परळ (मुंबई) येथे झालेल्या कामगारांच्या सभेचे अध्यक्षस्थान शाहु महाराजांनी भुषविले.

·         1918 साली शाहु महाराजांनी नवसारी (गुजरात) येथे भरलेल्याआर्य समाजच्या 11 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष पद भुषविले.

·         19 एप्रील 1919 रोजी शाहु महाराजांनी कानपुर येथे भरलेल्या कुर्मी क्षत्रीय परीषदेच्या 13 व्या अधिवेशानाचे अध्यक्षपद भुषविले.

·         21 एप्रील रोजी याच कार्यक्रम दरम्यान शाहु महाराजांना राजर्षी ही पदवी बहाल करण्यात आली.

·         1920 मध्ये शाहु महाराजांनी गुजरात मधील भावनगर येथील आर्य समाजाच्या परीषदेचे अध्यक्षपद भुषविले.

·         1920 मध्ये शाहु महाराजांनी नागपुर दिल्ली येथील अखिल भारतीय बहीष्कृत परीषदेचे अध्यक्षपद भुषविले.

·         20 मार्च 1990 राजी शाहु महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील माणगांव येथील दलीतांच्या परीषदेसत अपस्थित राहुन डॉ आंबेडकर यांनी दलीत समाजाचे नेतृत्व करावे असे प्रोत्साहन दिले.

·         1920 साली कर्नाटक मधील हुबळी येथे ब्राम्हणेत्तर परीषद भरविण्यात आली होती या परीषदेचे शाहु महाराज अध्यक्ष होते.

शाहु महाराजांनी मिळालेले सन्मान पदव्या :

shahu maharaj mahiti marathi

            ·        
ब्रिटन राणी व्हिक्टोरीयाच्या वतीने शाहु महाराजांना GCSI हा इंग्रज शासनाचा बहुमान लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या हस्ते देण्यात आला.

·         14 मे 1900 रोजी व्हिक्टोरीया राणीच्या वाढदिवसानिमीत्ताने ब्रिटीश सरकारने शाहु महाराजांनामहाराजाही पदवी दिली.

·         16 एप्रील 1920 रोजी शाहु महाराजांना नाशिकच्या जनतेकडुन मानपत्रे अर्पण करण्यात आली.

·         शाहु महाराज म्हणजे सर्वांगपुर्ण राष्ट्रपुरूषअसा गौरव महर्षी वि रा शिंदे यांनी केला.

·         “He was king, But democratic king” असे शाहु महाराजांचे वर्णन भाई माधवराव बागल यांनी केले.

·         महाराष्ट्राचा गौतमबुद्धअसे वर्णन यशवंतराय मोहिले यांनी केले.

·         उत्तरप्रदेश मधील कानपुर विद्यापीठास शाहु महाराजांचे नाव देण्यात आले आहे.

·         He was a pioneer of social Democracy” असे शाहु महाराजांबद्दल उद्गार डॉ. आंबेडकर यांनी काढले.

-------------------------------------------------------------------------------------------

इतिहासकारिता खालील पुस्तके नक्की वाचा : 


---------------------------------------------------------------------------

 हे सुध्हा वाचा : 

-------------------------------------------------------------------------------------------

Spardhankur  (युट्यूब चॅनेल):

https://www.youtube.com/channel/UCLM5rHq-TdFhg9desmbBzPw


स्पर्धांकुर MPSC (टेलिग्राम ग्रुप):

https://t.me/spardhankur


MPSC संपूर्ण तयारी (टेलिग्राम चॅनेल):

https://t.me/official_mpscalert


स्पर्धा परीक्षा माहिती मंच( फेसबुक पेज):

www.facebook.com/spardhankur

Post a Comment

Previous Post Next Post