:books:बिगरमानांकित रामकुमारला २६व्या वाढदिवसाच्या दिवशी अमेरिकेच्या सातव्या मानांकित सेबॅस्टियन कोर्डाकडून ४-६, ४-६ असा पराभव स्वीकारावा लागला. रामकुमारचा पराभव झाला असला तरी या वर्षांतील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
:books:या उपविजेतेपदासोबतच त्याने जागतिक क्रमवारीत पहिल्या २०० मध्ये स्थान मिळवले आहे. त्याच्या क्रमवारीत ६० गुणांची भर पडली असून त्याला १८५वे स्थान मिळाले आहे.
:books:पहिल्या सेटपासून रामकुमारने चुरस द्यायचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या सेटमध्ये तर ४-४ अशी बरोबरी होती. त्यामध्येच रामकुमारला पुढच्या गेममध्ये ४०-० अशी आघाडी मिळाल्याने ५-४ असा गुणफलक करण्याची संधी होती. मात्र तिथे सलग पाच गुण गमावत रामकुमारने सामन्यावरील नियंत्रण पूर्णपणे घालवले होते.
:books:रामकुमार कारकीर्दीत पाचव्यांदा चॅलेंजर स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेतेपद पटकावू शकलेला नाही. याआधी तहलीस (एप्रिल २०१७), विनेत्का (जुलै २०१७), पुणे (नोव्हेंबर २०१७) आणि तैपेई (एप्रिल २०१८) येथील चॅलेंजर स्पर्धामध्ये त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.
2. करोना काळातलं पहिलं मिशन, ISRO कडून PSLV C49 लाँच-
:books:करोना काळात इस्रोने अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने आपलं मिशन पार पाडलं आहे. ISRO PSLV -C49 चं लाँचिंग करुन भारताने आणखी एक इतिहास घढवला आहे.
:books:३ वाजून २ मिनिटांनी हे PSLV C49 लाँच करण्यात येणार होतं मात्र यासाठी १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागला. इस्रोचं हे ५१ वं मिशन आहे. या प्रक्षेपणाचं लाइव्ह प्रसारण इस्त्रोची वेबसाइट, यूट्युब चॅनल, फेसबुक आणि ट्विटरवरही करण्यात आलं.
:books:अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट हे अर्थ अर्थ ऑब्झर्वेशन रिसेट सॅटेलाइटचेच आधुनिक व्हर्जन आहे. याद्वारे ढगांच्या आडूनही पृथ्वीवरचे फोटो सुस्पष्टरित्या टिपता येणार आहेत.
:books:दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रोचं या मोहिमेसाठी कौतुक केलं आहे. आपला देश करोना संकटाशी लढत असतानाही देशाच्या वैज्ञानिकांनी जे यशस्वी लाँचिंग करुन दाखवलं त्याचा मला अभिमान वाटतो अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचं कौतुक केलं आहे.
:books:EOS-01 हे एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे. याचा उपयोग शेती, फॉरेस्ट्री आणि आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी करण्यात येणार आहे. कस्टमर सॅटेलाईट्सला कमर्शिअल कराराअंतर्गत लाँच करण्यात आला आहे. हा करार न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेससोबत करण्यात आला आहे.

3. १ जानेवारी २०२१ पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ बंधनकारक-
:books:मोदी सरकारने आता सर्व चारचाकी वाहनांसाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्ट टॅग’ अनिवार्य केला आहे. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढले आहे. ज्यामध्ये १ जानेवारी पासून सर्व चार चाकी वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ अनिवार्य करण्यात आला आहे.
:books: विशेष म्हणजे हा नियम जुन्या म्हणजेच ज्यांची विक्री १ डिसेंबर २०१७ च्या अगोदर झालेली आहे, अशा वाहनांसाह M व N कॅटेगिरीतील वाहनांना देखील लागू असणार आहे.
:books:केंद्रीय मोटार मोटार वाहन नियम १९८९ नुसार ‘फास्ट टॅग’ ला १ डिसेंबर २०१७ नंतर खरेदी करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांच्या सर्व रजिस्ट्रेशनसाठी अनिवार्य केले गेले होते आणि वाहन निर्माता किंवा डीलरद्वारे ‘फास्ट टॅग’चा पुरवठा केला जात होता. याचबरोबर हे देखील अनिवार्य करण्यात आले होते की, फिटनेस प्रमाणपत्राचे रिन्युअल केवळ ट्रान्सपोर्ट वाहनांवर ‘फास्ट टॅग’ लावल्यानंतरच केले जाईल.
:books: नॅशनल परमीट वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ लावणे १ ऑक्टोबर २०१९ पासून बंधनकारक करण्यात आले होते.
:books:मंत्रालयाचे म्हणने आहे की, थर्ड पार्टी इंश्युरन्स घेताना देखील मान्यताप्राप्त ‘फास्ट टॅग’ बंधनकारक असेल. हे इंश्युरन्स सर्टिफिकीटच्या पाहणीवरून होईल, जिथे ‘फास्ट टॅग’ चा आयडी डिटेल्स पाहिल्या जाईल. हा निर्णय १ एप्रिल २०२१ पासून लागू होईल.

4. कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना-
:books:कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी यासंबंधी आदेश दिला आहे.
:books:मराठा विकास प्राधिकरणासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली असून निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
:books:कर्नाटक राज्यात तसंच खासकरुन सीमारेषेवरील परिसरात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजातील नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एएनआयने यासंबधी वृत्त दिलं आहे.
:books:अधिकृत आदेशानुसार, गेल्या कित्येक दशकांपासून कर्नाटक राज्यात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजाच्या विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा विकास प्राधिकरणाचं मुख्य लक्ष्य समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक विकासाकडे असणार आहे.
:books:बसवकल्याण विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून त्याच्या आधी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी हा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघात मराठा समाजातील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेस नेते बी नारायण राव यांचं करोनामुळे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे.
:books: बंगळुरुमधील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकीची तारीख जाहीर केलेली नाही.

5. प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचे निधन:-
:books:प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी याचे निधन झाले आहे. ते ८५ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यामुळे सौमित्र चटर्जी यांना लाइफ स्पोर्टवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
:books:सौमित्र चटर्जी यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यामुळे ६ ऑक्टोबर रोजी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर योग्य उपचारानंतर त्यांनी करोनावर मात केली होती. मात्र, त्यानंतर कोव्हिड एन्सेफॅलोपॅथी आणि कॉम्पिकेशन्समुळे त्यांची प्रकृती हळूहळू खालावली.
:books:सौमित्र चटर्जी यांच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
कोण आहेत सौमित्र चटर्जी
:books:सौमित्र चटर्जी हे बंगाली कलाविश्वातील एक नावाजलेलं नाव होतं. त्यांनी १९५९ मध्ये अपुर संसार या चित्रपटाच्या माध्यमातून करिअरची सुरुवात केली.
:books: प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्यासोबत त्यांनी जवळपास १४ चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
:books:विशेष म्हणजे फ्रान्समधील सर्वात मानाचा Ordre des Arts et des Lettres या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचसोबत त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेदेखील गौरविण्यात आलं होतं.
:books: इतकंच नाही तर ३ वेळा त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार , ७ फिल्मफेअर व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

-------------------------------------------------------------------------------------------
हे सुध्हा वाचा :
- जगातली 10 महागडी चलन
- भारतातील राज्ये आणि त्यातील नृत्यप्रकार
- मराठी व्याकरणधारीत प्रश्न मंजूषा
- भारतीय राज्यघटना
- भारतीय राजघटनेवर आधारित प्रश्नमंजुषा
-------------------------------------------------------------------------------------------
Spardhankur (युट्यूब चॅनेल):
https://www.youtube.com/channel/UCLM5rHq-TdFhg9desmbBzPw
स्पर्धांकुर MPSC (टेलिग्राम ग्रुप):
MPSC संपूर्ण तयारी (टेलिग्राम चॅनेल):
https://t.me/official_mpscalert
स्पर्धा परीक्षा माहिती मंच( फेसबुक पेज):
Post a Comment