जागतिक वित्त बाजारात पैश्याची देवान-घेवाण तसेच जास्तीत जास्त अर्थ व्यवहार हे अमेरिकन डॉलर च्या स्वरुपात होत असतात. आर्थिकदृष्ट्या बलाढ्य अमेरिका आणी त्याच्या ह्या चलनाला जागतिक स्तरावर दबदबा आहे. अमेरीकेचे जागतिक बँकेवर असणारे वर्चस्व तसेच जगातील सगळ्यात बलाढ्य अर्थव्यवस्था ह्याचा देखील परीणाम जागतिक व्यापारावर होत असतो. आपण देखील आंतरराष्ट्रीय व्यवहार अमेरिकन डॉलर च्या स्वरुपात करतो. त्याच प्रमाणे युरोपियन देशामध्ये आणी युरोपियन युनियन मध्ये वापरले जाणारे 'युरो' हे देखील जागतिक स्तरावरील एक महत्वाचे चलन आहे. त्याच प्रमाणे युनायटेड किग्डमचे 'स्टर्लिंग पौंड' हे देखील एक महत्वाचे चलन आहे.
ही सर्वी चलने जागतिक स्तरावर महत्वाची तर आहेतच आणी आपण सर्वांना ज्ञात सुधा आहे परंतु जगात अजूनही असे काही चलने आहेत जी जागतिक स्तरावर डॉलर एवढी महात्वाची नाही आणी आपणाला ज्ञात ही नाही परंतु त्यांचे मूल्य प्रचंड आहे. त्यातील जास्तीत जास्त चलने ही तेल समृद्ध अश्या आखाती देशातील आणी आर्थिक समृद्ध असणाऱ्या युरोपातील आहे. तेलाच्या व्यापारामुळे आणी जागतिक स्तरावर होणात्या प्रचंड उलाढालीमुळे त्यांचे मूल्य आपल्या रुपयाच्या तसेच डॉलर च्या तुलनेत प्रचंड वाढले आहे. अर्थात त्याला इतरही आर्थिक कारणे आहेत.
आज आपण ती चलने बघत आहोत ज्याची जागतिक स्तरावरील मूल्य प्रचंड वधारले आहे. यात पहिला क्रमांक लागतो तो कुवेत देशाच्या 'कुवेत दिनार' चा....
(चलनाचा हा दर '25-7-2014-शुक्रवार' नुसार घेतलेला आहे)
1- कुवेत दिनार (1 कुवेत दिनार= 212.37 रुपये)
कुवेत या आखाती देशाचे असलेले 'दिनार' हे चलन रुपयाच्या तसेच डॉलरच्या तुलनेत सर्वात महाग आहे. 1 दिनार साठी आपल्यला तब्बल 212 रुपये किवा 3.54 अमेरिकन डॉलर मोजावे लागणार आहे.
2- माल्टीस लिरा (1 माल्टीस लिरा = 187.88 रुपये)
माल्टीस लिरा हे माल्टा ह्या देशाचे चलन आहे. फारश्या कुणाच्या ध्यानीमनी नसणाऱ्या ह्या देशाच्या चलनासाठी 1 लिरा साठी आपल्याला तब्बल 187 रुपये मोजावे लागणार आहे.
3- बहरिनी दिनार ( 1 बहरिनी दिनार= 159.31 रुपये)
हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे चलन आहे. बहरीन या आशियायी खंडातील देशाच्या चलनासाठी तब्बल 159 रुपये मोजावे लागणार आहे .
4- ओमानी रियाल (1 ओमानी रियाल = 155.99 रुपये)
एक अरेबियन देश असणारा ओमान हा दक्षिण आशियायी देश असून चलनाच्या बाबतीत चवथ्या क्रमांकावर आहे.
आपल्याला 159.99 म्हणजेच 160 रुपये मोजून 1 रियाल मिळेल.
5- ल्याट्वियन ल्यात्स (1 ल्याट्वियन ल्यात्स = 144.77 रुपये )
ल्याट्विया ह्या युरोप खंडातील लहानश्या देशाचे हे चलन जगात 5 वे महागडे चलन आहे.
6- सायप्रस पौंड (1 सायप्रस पौंड= 137.82 रुपये)
युरोपमध्ये असलेले सायप्रस नावाचे हे लहानसे बेट पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. पर्यटनावर आधारलेल्या ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेत परकीय चलनाची गंगाजळी जमा होत असते.
137 रुपये एक सायप्रस पौंडसाठी मोजणे हे नक्कीच आपण भारतीयांसाठी महागडे आहे.
7- स्टर्लिंग पौंड (1 स्टर्लिंग पौंड= 101.96 रुपये)
हे युनायटेड किग्डम म्हणजेच ग्रेट ब्रिटन चे चलन आहे. जगात वापरल्या जाणाऱ्या 5 मुख्य चलनापैकी हे एक चलन आहे.
8- जोर्डनियन दिनार (1 जोर्डनियन दिनार = 84.81 रुपये)
प्यालेस्टीन, इस्त्रैल ई. सद्या चर्चेत असणात्या देशाला लागून असणात्या जोर्डन या आशियायी खंडातील देशाचे हे चलन.
9- युरोपियन युरो (1 युरो= 80.66 रुपये)
युरीपियन युनियन मध्ये असणाऱ्या 28 देशांपैकी 17 देशाचे 'युरो' हे अधिकृत चलन आहे. युरो हे चलन 1999 पासून अमलात आले आहे.
10- अझरबैजान मनत (1 अझरबैजान मनत= 76.59 रुपये)
पश्चिम आशियात असणारा हा देशाचे चलन 10वे महागडे चलन आहे.
तर ही आहे जगातील 10 महागडी चलने. परंतु तुम्ही ही लिस्ट वाचून आश्चर्यचकित झाला असाल ना कारण कि यात अमेरिकन डॉलर कुठेच नाही आहे. नक्कीच तो जगातील महागड्या 10 चलनात नाही आहे परंतु जगात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या चलनात त्याचा सर्वात वरचा क्रमांक आहे हे नाकारता येत नाही.
Post a Comment