मायक्रो फायनान्स कंपनी बंधन पुढच्या वर्षीच्या पूर्वार्धात ६००शाखांसहित नवी बँक सुरू करीत असून त्यासाठी फिडेलिटी इन्फॉर्मेशन सर्व्हिस (एफआयएस) तांत्रिक साह्य देणार आहे. या शाखांद्वारे एक कोटी ग्राहक जमवण्याचे बंधन बँकेचे ध्येय असल्याची माहिती 'एफआयएस'ने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दिली आहे. बँकेला संपूर्ण तांत्रिक मदत 'एफआयएस'चीच असून युनिव्हर्सल बँकिंगसाठी लागणारे एकात्मिक बँकिंग आणि पेमेंटच्या सुविधा पुरवण्याची जबाबदारी 'एफआयएस' असेल.
रिझर्व्ह बँकेने यावर्षी एप्रिलमध्ये दोन वित्तीय कंपन्यांना नवी बँक सुरू करण्याची तत्त्वतः परवानगी दिली आहे. त्यात, आयडीबीआय आणि बंधन या कंपन्यांचा समावेश आहे. बँक सुरू करण्याच्या सर्व तांत्रिक आणि आर्थिक बाबी पूर्ण केल्यानंतर त्याची शहानिशा करून या कंपन्यांना बँकेचे व्यवहार सुरू करण्याची परवानगी रिझर्व्ह बँक देईल. त्यासाठी कंपन्यांना १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. बंधन ही कोलकातास्थित मायक्रोफायनान्स कंपनी आहे तर, आयडीबीआय ही पायाभूत क्षेत्रासाठी वित्तीय साह्य करणारी कंपनी आहे.
सौजन्य- महाराष्ट्र टाईम्स.
إرسال تعليق