1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या महत्त्वाकांक्षी योजनेच्या ब्रँड ऍम्बेसिडर पदासाठी इन्दौर आयआयटीतील टॉपर 'कृती तिवारी'ची निवड करण्यात आली आहे.
2. फेसबुकने कोणताही विशेष गाजावाजा न करता त्यांच्या फेमस लोगोत बदल केला आहे. मात्र हे करताना ही काळजी घेतली गेली आहे की लोगो बदललाय हे सहजी लक्षातही येऊ नये. नवा लोगो प्रथमदर्शनी जुन्या लोगोप्रमाणेच दिसला तरी त्यात सूक्ष्म बदल आहेत.
3. जगातील सर्वात मोठा स्विमिंग पूल चिली देशातील अल गार्रोबो शहरात असलेल्या सॅन अल्फासो डेल मॅर येथील रिझॉर्टमध्ये तयार करण्यात आला आहे.
लतरण तलाव तब्बल 20 एकर जागेत पसरलेला आहे. म्हणजे 11 फुटबॉलची मैदाने मावतील एवढ्या जागेत. येथील तापमानही 7 ते 8 डिग्रीच्या दरम्यान असेल.
4. पंतप्रधान मोदींच्या हस्ते १ जुलैला डिजिटल लॉकर सुविधा लाँच केली आहे.
5. कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यांना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
6. चार भारतीयांना मिळणार ‘द प्राईड ऑफ अमेरिका’ सन्मान.
हार्वर्ड महाविद्यालयाचे अधिष्ठाता राकेश खुराणा, संपादिका मधुलिका सिक्का, लेखक अब्राहम वर्गिस आणि न्यूयॉर्क दक्षिण जिल्ह्याचे अॅटर्नी प्रीत भराणा यांना या वर्षीच्या ‘ग्रेट इमिग्रंट्स : द प्राईड ऑफ अमेरिका’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
7. चिपळुण मधील नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे डीबीजे महाविद्यालय ठरले महाराष्ट्रातील पहिले डिजिटल एम.बी.ए. कॉलेज.
Post a Comment