डॉ. अब्दुल कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक वैशिष्ट्य असे की, त्यांच्यावर आजपर्यंत कोणीही एका शब्दानेही ट टीका केलेली नाही. खरे तर त्यांना अनेकदा अनेकांना दुखवावे लागले होते तरीही ते अजातशत्रू राहिले. त्यांना मिसाईल मॅन म्हटले जाते पण हे अभिधान मिळवणे हे काही सोपे काम नव्हते. भारताची काही क्षेपणास्त्रे पूर्णपणे भारतीय बनावटीची आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे संचालक म्हणून हे काम करून घेताना डॉ. कलाम यांना आपल्या सोबत काम करणार्या अनेक अधिकारी, तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ यांच्यात समन्वय साधावा लागला होता. मिसाईलचे सुटे भाग अनेक देशी कंपन्यांकडून तयार करून घेतले होते. अशा एकूण हजारभर कंपन्यांशी समन्वय साधून त्यांच्याकडून काम करून घेणे हीही मोठी कसरतच होती पण तीही डॉ. कलाम यांनी केली.
त्या सहकारी आपल्या मुलांना विसरून कामाला लागला. उशिरापर्यंत थांबून त्याने काम केले. ते पूर्णही झाले. तो उशिराने घरी आला. आपली मुले आपली वाट पाहून हिरमुसली असतील या कल्पनेत तो आपल्या मुलांना सॉरी म्हणण्याच्या मूडमध्येच घरी आला होता पण घरी आल्यावर पाहिले तर मुले अजीबात नाराज नव्हती. ती उलट खुशीत होती. कारण त्यांच्या बाबा वेळेवर घरी आले नव्हते तरीही त्यांची बागेची सफर मजेत पार पडली होती. त्यांना डॉ. कलाम काकांनी बागेत नेले होते. कर्तव्य आणि आपल्या सहकार्यांच्या भावना यांचा असा सुरेख मेळ घालण्याची अशी कला डॉ. कलाम यांना अवगत होती.
सौजन्य- माझा पेपर
إرسال تعليق