■ भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल ■
════════════════
● महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी याची नियुक्ती करण्यात आली आहे.
● सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली आहे.
● ते महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल असतील.
● सी. विद्यासागर राव यांनी 30 ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली होती, त्यांचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 रोजी संपला.
★ भगत सिंह कोश्यारी ★
● भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील नामती चेतबागड गावात झाला. झाला.
● उत्तराखंडमधील भाजपाचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा पक्षातील प्रवास आहे.
● उत्तराखंडमधील भाजपाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे.
● 2001 ते 2002 मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा कारभार केला.
● 2002 पासून 2007 पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
● 2008 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले होते.
● भगत सिंह कोश्यारी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी जवळीक आहे. 1977 मधील आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरूंगवासही भोगलेला आहे.
● त्यांनी इंग्रजी साहित्यातून पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. ते शिक्षक आणि पत्रकारही होते.
● 1975 मध्ये पिथोरागडहून प्रकाशित होणाऱ्या 'पर्वत पीयूष' साप्ताहिकाचे ते संस्थापक तसेच प्रबंध संपादक होते.
◆ महाराष्ट्रासह राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि तेलंगाणाच्या राज्यपालपदाच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
◆ नवीन राज्यपाल ◆
● भगत सिंह कोश्यारी : महाराष्ट्र
● कलराज मिश्रा : राजस्थान
● बंडारू दत्तात्रय : हिमाचल प्रदेश
● आरीफ मोहम्मद खान : केरळ
● तमिलीसाई सौंदराजन : तेलंगणा
⚪️ कालराज मिश्रा ⚪️
● कालराज मिश्रा काही काळापूर्वीपर्यंत हिमाचलचे राज्यपाल होते.
● कालराज हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारकही आहेत.ते केंद्र आणि यूपी सरकारमधील कॅबिनेट मंत्री होते.
● सन २०१० ते २०१२ पर्यंत ते प्रदेश भाजपाचे प्रभारी होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे प्रभारी होते.
● ते तीन वेळा राज्यसभेचे खासदार आणि एकदा देवरियाचे लोकसभेचे सदस्य होते.
⚪️ बंडारू दत्तात्रेय ⚪️
● बंडारू दत्तात्रेय भारतीय जनता पक्षाच्या संयुक्त आंध्र प्रदेश युनिटचे अध्यक्ष राहिले आहेत.
● मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते कामगार आणि रोजगार मंत्री होते.
● 1965 मध्ये ते आरएसएसमध्ये दाखल झाले. आणीबाणीच्या वेळी ते तुरूंगातही गेले होते.
⚪️ आरिफ खान ⚪️
● आरीफ खान दोनदा कॉंग्रेसमध्ये,तसेच जनता पक्ष व बसपाकडून प्रत्येकी एकदा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत.
● शाह बानो प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल करण्याच्या कायद्याच्या विरोधात राजीव गांधी सरकार ला त्यांनी राजीनामा दिला होता.
● 2004 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2007 मध्ये त्यांनी भाजप सोडला आणि राजकारणापासून अलिप्त झाले.
● तिहेरी तालक तसेच कलम 370 वर आरिफ खान यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले होते.
⚪️ तमिलीसाई सौंदराजन ⚪️
● या व्यवसायाने डॉक्टर आहेत.
● यापूर्वी त्यांनी तामिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
● या नियुक्तीपूर्वी ते भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव होत्या.
● त्यांना ‘तमिळनाडूच्या सुषमाजी’ म्हणून ओळखले जाते.
إرسال تعليق