चालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert

Chalu Ghadamodi MPSC


 बिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:-

:books:टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी बिल गेट्सना मागे टाकत जगातल्या श्रीमंताच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे. ४९ वर्षीय एलन मस्क यांची नेटवर्थ १२७.९ अरब डॉलर्स इतकी झाली आहे.

:books:टेस्लाचे शेअर्स उंचावल्याने त्यांचं नेटवर्थ वाढलं आहे. टेस्लाची मार्केट व्हॅल्यू आता ४९१ अरब डॉलरपर्यंत पोहचली आहे. जानेवारी महिन्यात एलन मस्क हे जगातल्या श्रीमंतांच्या यादीत ३५ व्या क्रमांकावर होते.

:books:मात्र आता मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क यांनी जगातल्या श्रीमंताच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे.

:books:एलन मस्क यांच्या नेटवर्थ १००.३ अरब डॉलर्सची वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सच्या माहितीनुसार जानेवारीत मस्क हे श्रीमंताच्या यादीत ३५ व्या स्थानावर होते.

:books: आता ते दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहेत. या वर्षात आत्तापर्यंत एलन मस्क यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी १८३ अरब डॉलरच्या संपत्तीसह जेफ बेजोस पहिल्या क्रमांकावर होते. तर १२८ अरब डॉलर्सच्या संपत्तीसह बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर होते.

:books:हे स्थान आता एलन मस्क यांनी पटकावलं आहे. १०२ अरब डॉलर्सच्या संपत्तीसह मार्क झुकरबर्ग हे पाचव्या क्रमांकावर आहेत.

:books:बिल गेट्स हे यांच्या श्रीमंताच्या यादीतील दुसरा क्रमांक हा दुसऱ्यांदा दुसऱ्या कुणाच्या तरी नावावर नोंदवला गेला आहे. बिल गेट्स खरंतर अनेक वर्षांपासून जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते.

:books:मात्र अॅमेझॉनचे फाऊंडर जेफ बेजोस यांनी २०१७ मध्ये पहिला क्रमांक मिळवला. यानंतर बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर आले. आता हा दुसरा क्रमांक एलन मस्क यांनी मिळवला आहे.

द्रीनाथ महाराज तनपुरे यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर:-

:books:राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा २०१९-२० या वर्षासाठीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना घोषित करण्यात आला आहे.

:books:कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी या पुरस्काराची घोषणा केली. ( Dnyanoba Tukaram Award Announced To Badrinath Maharaj Tanpure )

:books:संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

:books:पाच लाख रुपये, मानपत्र तसेच मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

:books:बद्रीनाथ महाराज तनपुरे हे पंढरपुरातील तनपुरे महाराज आश्रमाचे विद्यमान अध्वर्यू असून वारकरी परंपरा आणि गाडगे महाराजांची परंपरा याचा समन्वय साधणारे संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जातात.

:books:पूज्य साने गुरुजींपासून ते डॉ. नरेंद्र दाभोलकरांपर्यंत परिवर्तनाच्या चळवळीतील विविध घटकांशी त्यांचे साहचर्य राहिले आहे. वारकरी समाजासाठी तसेच समाजातील उपेक्षित वर्गांमधील घटकांसाठी मठातर्फे नानाविध कल्याणकारी उपक्रमांचे सतत आयोजन करण्यात येत असते.

:books:अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक सदस्य व पदाधिकारी तसेच कीर्तनकार व प्रवचनकार म्हणून ते सर्वपरिचित आहेत.

:books:यापूर्वी हा पुरस्कार रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लहवितकर, डॉ. यु. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, उषा देशमुख, ह. भ. प. निवृत्ती महाराज वक्ते, डॉ. किसन महाराज साखरे, मधुकर जोशी यांना प्रदान करण्यात आला आहे.

डग्लस स्टुअर्ट यांच्या ‘शगी बेन’ला बुकर:-

:books:ग्लासगो शहरातील १९८०च्या दशकातील निम्नमध्यमवर्गीय जगणे केंद्रभागी करणाऱ्या स्कॉटिश अमेरिकी लेखक डग्लस स्टुअर्ट यांच्या ‘शगी बेन’ कादंबरीला यंदाचा बुकर पुरस्कार मिळाला. त्यांची ही पदार्पणातील कादंबरी आहे.

:books:स्टुअर्ट यांनी स्कॉटलंडमधील बालपण आत्मकथेऐवजी कादंबरीच्या रुपात समोर आणले. उपजीविकेसाठी वस्रोद्योगात असलेल्या या लेखकाने  ग्लासगो शहर आणि त्या भवतीच्या उपनगरांचे पर्यटन ‘शगी बेन’मधून घडविले. तिथल्या माणसांइतक्याच कुरूप बनलेल्या शहरांचे हे तिथल्या साहित्य किंवा पत्रकारितेतूनही अधोरेखित न झालेले सूक्ष्म अवलोकन आहे.

:books:दुबईस्थित भारतीय वंशाच्या लेखिका अवनी दोशी यांचे नाव अंतिम सहा लेखकात होते, पण त्यांच्या ‘बन्र्ट शुगर’या कादंबरीला बुकरचा मान मिळाला नाही. झिम्बाब्वेचे लेखक त्सित्सी दांगारेम्ब्वा यांची ‘धिस मोर्नेबल बॉडी’, डायन कुक यांची ‘दी विल्डरनेस’, माझा मेंगिस्टे यांची ‘दी श्ॉडो किंग’, ब्रँडन टेलर यांची ‘रिअल लाइफ’ या कादंबऱ्या शर्यतीत होत्या. स्टुअर्ट यांनी कादंबरी आपल्या आईला अर्पण केली आहे.

:books:लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ आर्ट या संस्थेतून स्टुअर्ट पदवीधर झाले. नंतर ते फॅशन डिझायनिंगमध्ये कारकीर्द करण्यासाठी न्यूयॉर्कला आले. कालव्हीन क्लेन, राल्फ लॉरेन, गॅप या उत्पादनांसाठी त्यांनी काम केले असून फावल्यावेळात त्यांनी एक दशकापूर्वी लेखन सुरू केले होते.

केलमन यांचे स्मरण

:books:स्टुअर्ट हे बुकर पुरस्कार मिळालेले दुसरे स्कॉटिश लेखक आहेत. यापूर्वी १९९४ मध्ये जेम्स केलमन यांना हा पुरस्कार ‘हाउ लेट इट वॉज, हाउ लेट’ या पुस्तकासाठी मिळाला होता. ‘त्या कादंबरीमुळे पहिल्यांदा माझे आयुष्य बदलले होते, कारण त्यात मला पहिल्यांदा माझे लोक, माझी बोली भेटली होती.’,असे स्टुअर्ट यांनी केलमन यांच्या पुस्तकाबाबत म्हटले आहे.

तीस संपादकांच्या नकारानंतर..

:books:डग्लस स्टुअर्ट यांची बुकर पुरस्कारप्राप्त ‘शगी बेन’ ही कादंबरी तीस संपादकांनी नाकारली होती. एका बडय़ा प्रकाशनाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. कादंबरी प्रकाशित होताच तिचा बोलबाला झाला आणि आता ती बुकरची मानकरी ठरली.

Post a Comment

أحدث أقدم