आधुनिक भारताच्या इतिहासातील विविध घटना, त्याचे वर्ष आणि त्या घटनेचे कार्यकर्ते इथे खाली देण्यात आलेले आहे. प्रत्येक वेळेस संपूर्ण उतारे न वाचता केवळ एका वाक्यात रिव्हिजन व्हावी या उद्देशाने ही पोस्ट बनवण्यात आली आहे. पेपरच्या अगोदर रिविजन म्हणून तुम्ही हे एका वाक्यात दिलेल्या गोष्टी वाचू शकता.
🔹 गांधीजीनी आपल्या कार्याची सुरुवात या देशातून केली. -दक्षिण आफ्रिका
🔹 बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह व गुजरात मधील खेडा जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी चळवळ ...... यांनी केली. - महात्मा गांधी
🔹 इ.स. 1881 मध्ये लॉर्ड रिपनने इंग्लंडप्रमाणे भारतात .......... पास केला.- ‘फॅक्टरी अॅक्ट‘
🔹 शेतकऱ्यांनी १९१८ मध्ये ........... जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरु केली. - खेडा(गुजरात)
🔹 १३ एप्रिल १९१९ या दिवशी अमृतसरमध्ये जालियनवाला बाग येथील सभेवर अमानुष गोळीबार करणारा इंग्रज अधिकारी -जनरल डायर
🔹 जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून यांनी आपली 'सर' ही पदवी ब्रिटीश सरकारला परत केली. - रविंद्रनाथ टागोर
🔹 जालियनवाला बाग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकाने ..... कमिशन नेमले. -हंटर
🔹 रौलेट कायदा........... या नावाने ओळखला जातो. -काळा कायदा
🔹 महात्मा गांधीजींचा जन्म ........... रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. - २ ऑक्टो.१८६९
🔹 खिलाफत चळवळीचे अध्यक्ष …..... हे होते. - महात्मा गांधी
🔹 गांधीजींनी १९२० साली सुरू केलेली असहकार चळवळ ........... या घटनेमुळे स्थगित केली. - उत्तर प्रदेशात चौरीचौरा येथील दंगल
🔹 चितरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी १९२३ मध्ये ........या पक्षाची स्थापना केली. - स्वराज्य पक्ष
🔹 पुणे जिल्हयात झालेल्या 'मुळशी सत्याग्रहाचे' नेतृत्त्व ...... यांनी केले. - सेनापती बापट
🔹 गुजरात मधील बार्डोली येथील शेतकऱ्यांच्या लढ्याने नेतृत्व ... यांनी केले.
- सरदार वल्लभाई पटेल
🔹 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या (आयटक) पहिले अधिवेशनाचे ..... अध्यक्ष होते. -लाला लजपतराय
🔹 सायमन कमिशनवर भारतीयांनी बहिष्कार टाकण्याचे प्रमुख कारण ..... हे होते. - त्या कमिशनमध्ये एकही भारतीय नव्हता.
🔹 लाहोर येथे सायमन कमिशन विरूध्द झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व...... यांनी केले. -लाला लजपतराय
१९२९ च्या लाहोर अधिवेशनाचे ..... अध्यक्ष होते. -पं. जवाहरलाल नेहरू
🔹 १९२९ च्या लाहोर अधिवेशनात ........ ठराव मांडण्यात आला. - पूर्ण स्वराज्याचा
🔹 लॉर्ड लिटनने मार्च 1878 मध्ये ............. पास करून देशी वृत्तपत्रावर अनेक बंधने लादली. - ‘व्हरनेक्यूलर प्रेस अॅक्ट' (देशी वृत्तपत्र कायदा)
🔹 ......... यांना 'पंजाबचा सिंह असे म्हटले जाते. - लाला लजपतराय
🔹 'अनहॅपी इंडिया' या पुस्तकाचे लेखक........ आहेत. - लाला लजपतराय
🔹 १९३० मध्ये महाराष्ट्रात ..... या शहरात 'मार्शन लॉ' (लष्करी कायदा) पुकारण्यात आला होता. - सोलापूर
🔹 खान अब्दुल गफरखान उर्फ सरहद गांधी यांनी स्थापन केलेली संघटना .......... - खुदा-ई-खिदमतगार किंवा लाल गलेवाले
🔹 भारतात इ.स. १८५६ मध्ये यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली. - लॉर्ड डलहौसी
🔹 अलिगड येथे सर सय्यद अहमद खान यांनी सुरू केलेल्या .......... कॉलेजला सक्रीय प्रोत्साहन व्हाईसरॉय नार्थब्रुकने दिले. - मुस्लिम अँग्लो ओरिएंट
नक्की वाचा : इंग्रजी समानार्थी शब्द त्याच्या उगंस्थांनावरून कसे लक्षात ठेवायचे.?
إرسال تعليق