हैदराबाद मुक्ती संग्राम आणी मराठवाडा प्रशासकीय विभाग | Rajyaseva | MPSC STI PSI ASO | MPSC Alert

Hydrabad mukti sangram marathwada

 

📌 आधी जाणून घेऊ मराठवाड्याबद्दल थोडंसं :-


◾️ मराठवाडा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकिय विभाग आहे.


◾️ मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे ६४,५९० चौ. किमी असून यामध्ये ८ जिल्हे आणि ७८ तालूके आहेत.


1) औरंगाबाद

2) नांदेड

3) परभणी

4) बीड

5) जालना

6) लातूर

7) उस्मानाबाद व

8) हिंगोली


◾️ मराठवाड्याचे प्रशासकीय मुख्यालय औरंगाबाद येथे आहे.


◾️ दक्षिणगंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या ५ जिल्ह्यातून वाहते. 


◾️जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे.


◾️यामध्ये वेरूळ, अजिंठासारख्या जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, ५२ दरवाजे, पानचक्की, ३ जोतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण, तूळजाभवानी मंदिर इत्यादी अप्रतिम आणि प्रसिद्ध स्थळे आहेत.



📌 मुक्ती संग्राम आणि पार्श्वभूमी :–


◾️पूर्वी मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानात होता.


◾️हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान  निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते.


◾️निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.


◾️हैदराबाद संस्थानची त्यावेळी तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येत होता.


◾️मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर खूप अत्याचार सुरु केले.


◾️दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.


◾️ मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले.


◾️मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्गजी जाधव, जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच सूर्यभान पवार आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम उत्स्फूर्तपणे लढला गेला.


◾️या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, गोविंदराव पानसरे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा नं बाळगता काम केले.


◾️या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल हे खूप मोठे आहे.


◾️निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून १३ सप्टेंबर १९४८ रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाली – ती सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामूळे. ते भारताचे तत्कालीन गृहमंत्री होते. खूप धाडसी परंतू योग्य अशा निर्णयामूळ॓ जनतेस न्याय मिळाला.


◾️मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे ४ वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर २ तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद  काबिज केले.


◾️१५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.


◾️हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी १७ सप्टेंबर १९४८ रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला.



📌 हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला…!:-



हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला…!


◾️१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन प्रशासकिय विभाग म्हणून ओळखला जाउ लागला.


◾️१७ सप्टेंबर १९४८ रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत.


==============================


खालील महत्वाच्या पोस्ट नक्की वाचा:


==============================

आम्ही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी 'स्पर्धांकुर' नावाचे युट्यूब चॅनेल तसेच 'स्पर्धा परीक्षा माहिती मंच ' नावाचे फेसबुक पेज आणि 'MPSC संपूर्ण तयारी' नावाचे टेलिग्राम चॅनेल सुद्धा चालवतो. तेथे आम्ही सर्व विषयावर संकल्पना आधारित व्हिडिओ, पोस्ट, चार्ट्स, जॉब्स माहिती टाकत असतो. चॅनेलल/पेजला भेट देण्याकरिता खालील नावावर क्लिक करा.


युट्यूब चॅनेल:- स्पर्धांकुर [Spardhankur]

टेलिग्राम चॅनेल:- MPSC संपूर्ण तयारी 


टेलिग्राम ग्रुप:- स्पर्धांकुर MPSC

जॉब अलर्ट वेबसाइट :-  My Desi Job

1 Comments

  1. मराठवाडा मुक्तिसंग्राम बद्दल सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यव//mahendrapatil1210.blogspot.com/"> राज्यशास्त्र विषयाशी संबंधित स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण लेख </a

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post